औरंगाबाद

पाचोड येथे हिंदी भाषा वाड्मय मंडळाचे उद्घाटन

 
विजय चिडे/ पाचोड : येथील शिवछत्रपती कला महाविद्यालय व लोकसेवा कला महाविद्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी विभागातर्फे हिंदी भाषा वाड्मय मंडळाचे मंगळवारी (दि.२६) रोजी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड (ता. नांदगाव) येथील प्रा. डॉ. विष्णू राठोड हे उपस्थित होते. यावेळी राठोड यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, व्याख्यानात त्यांनी हिंदी भाषेचा उगम, विकास व हिंदी भाषेची ची सद्य परिस्थिती याबद्दल सविस्तर विवेचन केले. हिंदी भाषा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. मधुरता, सहिष्णुता, लवचिकता व संगितात्मकता हे हिंदी भाषेचे गुण आहेत. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचा अभ्यास करून वाड्मय मंडळाच्या माध्यमातून कथा-कविता, उपन्यास, आत्मकथा, निबंध, रेखाचित्र, प्रवास वर्णन इत्यादी साहित्यप्रकाराचे लेखन करावे असे आवाहन प्रा. राठोड यांनी विद्यार्थ्यांना केले.

अध्यक्षीय समारोप लोकसेवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लियाकत शेख यांनीही वाड्मय मंडळातर्फे वर्षभर उपक्रम राबवावेत असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य सुरेश नलावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. उत्तम जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तुकाराम गावडे यांनी केले तर प्रा.डॉ. दस्तगीर देशमुख यांनी आभार मानले. तांत्रिक सहकार्य प्रा. संदीप सातोनकर व वैभव राऊत यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड व लोकसेवा महाविद्यालय औरंगाबादचे प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button