पत्रकार मारहाण प्रकरणी आरोपीस जामीन
सविस्तर माहिती अशि की ढोरकीन गावात पत्रकार दत्तात्रय मुळे यांचा प्लॉट आहे. या प्लॉटचे क्षेत्रफळ प्रॉपर्टी कार्डनुसार कमी भरत असल्याने पत्रकार दत्तात्रय मुळे यांनी भूमि अभिलेख कार्यालयाकडून कायदेशीर मोजणीची प्रक्रिया पूर्ण केली होती. दरम्यान मोजनी होण्याच्या अगोदर झाडे तोडू नका असे आम्हांस का म्हणतो असे म्हणत शेजारील आरोपींनी अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कायदा व सुव्यवस्था पायदळी तुडवत पत्रकार दत्तात्रय मुळे व भाऊ अमोल मुळे यांना आरोपी हबिब दाउद कुरेशी, आरीफ दाउद कुरेशी, जावेद दाऊद कुरेशी व फेरोज दाउद कुरेशी ( सर्व रा. ढोरकीन ता. पैठण) यांनी संगनमत करून जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली होती. दरम्यान पत्रकार दत्तात्रय मुळे यांनी याप्रकरणी पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी चारही आरोपींवर कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, (३४) प्रमाणे गुन्हा दाखल करून मंगळवारी(दि.२६ रोजी) दुपारी आरोपींना अटक केली होती. दरम्यान काल बुधवारी पैठण न्यायालयाने आरोपींची जामिनावर तात्पुरती मुक्तता केली आहे. या घटनेचा पुढील तपास पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरिक्षक दिलिप चौरे, पोलीस उपनिरिक्षक राहुल भदर्गे, राजेश चव्हाण, कर्तारसिंग सिंघल, तुकाराम मारकळ, राऊत, राजू जिवडे, एकनाथ मोरे, गणेश खंडागळे व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहेत.