सामाजिक
पंकज अरुण कडू मित्रमंडळाच्या वतीने रुग्णांकरिता रुग्णालय साहित्य सुविधा
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : सात्रळ येथील पंकज अरुण कडू मित्रमंडळाच्या वतीने सात्रळ सोसायटीच्या प्रांगणात आज झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात हॉस्पिटल बेड, व्हील चेअर, कमोड चेअर, वॉकर, एअर बेड ईत्यादी साहित्य रुग्णांकरिता उपलब्ध करून देत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात या साहित्याची आवश्यकता असते. त्याकरिता खर्च करणे सर्वांना परवडणारे नसते. याचा विचार करून पंकज कडू मित्रमंडळाने ही विनामूल्य सेवा सात्रळ पंचक्रोशीतील ग्रामस्थांकरिता सुरू केली आहे. या वस्तूंचा वापर झाल्यानंतर ईतर गरजू रुग्णांसाठी परत जमा कराव्या लागतील. यावेळी काही वृद्धांना मोफत आधार काठीचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंकज कडू, अनिलकुमार लोढा, नरेंद्र कडू, गणेश कडू, आकाश पलघडमल, दत्ता काका कुलकर्णी, राजेंद्र कडू, अरुण दिघे, अभिलाष कडू महेश कडू, अर्जुनराव गीते, बाबासाहेब चोथे, अविनाश कडू, दत्तात्रय पलघडमल, विक्रांत कडू, सतीश नालकर रघुनाथ नालकर, ऋषिकेश जोरी, पंकज हारदे, भाऊसाहेब पलघडमल आदी उपस्थित होते. सचिन पवार आणि संभाजी कडू यांनी उपक्रमाची माहिती दिली.