औरंगाबाद

निविष्ठा विक्रेत्यांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण संपन्न

विलास लाटे/पैठण : पैठण तालुका निविष्ठा विक्रेते बंधूंचे तालुकास्तरीय प्रशिक्षण वर्ग यश लॉन्स ढोरकीन येथे संपन्न झाला. सर्व विक्रेत्यांनी अनुदानित खतांची विक्री इपाॅस मशीन द्वारेच करावी. विक्रीचा साठा अद्यावत ठेवावा या बाबत कृषि विकास अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा परिषद मोहीम अधिकारी दिपक गवळी, कृषी अधिकारी विकास पाटील, रामकृष्ण पाटील, विकास चोंदे, इकोचे मॅनेजर कुलकर्णी, सावरगावे यांनी सर्वांना आवाहन केले. याप्रसंगी तालुक्यातील दोनशे विक्रेते उपस्थित होते.

याबाबत सर्व विक्रेत्यांना येणाऱ्या रब्बी हंगामातील नियोजन बाबत सूचना देण्यात आल्या. किटकनाशक हाताळणी करताना घ्यायची काळजी याचे प्रशिक्षण देण्यात आले. बैठकीस माफदा तालुका अध्यक्ष विनोद बोंबले, उपाध्यक्ष दिलीप देवळानकर, सचिव महेश मुंदडा, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री उगले, नामदेव शिरसाट, श्रीराम साळुंखे, श्री सुसे, मनोज पहाडे व तालुक्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी व विक्रेते उपस्थित होते.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button