अहमदनगर

नियमबाह्य पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती तात्काळ बरखास्त करा अन्यथा शाळेसमोर आमरण उपोषण : आप्पासाहेब ढुस

व्हिडीओ : नियमबाह्य पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समिती तात्काळ बरखास्त करा अन्यथा शाळेसमोर आमरण उपोषण : आप्पासाहेब ढुस 

देवळाली प्रवरा : येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये असलेल्या नियमबाह्य पालक शिक्षण संघ व शाळा व्यवस्थापन समिती तात्काळ बरखास्त करून शासन नियमानुसार समित्या स्थापन कराव्यात अन्यथा शाळेच्या गेट समोर दि. ७ ऑक्टोबर २१ पासून आमरण उपोषण करणार असल्याचे आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने नियमबाह्य पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करून वर्षानुवर्षे ती परंपरा सुरू ठेवल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची व खऱ्या पालकांची फसवणूक झाली आहे त्यामुळे नियमानुसार समित्या स्थापन कराव्यात अशी ढुस यांनी २५ ऑगस्ट रोजी मागणी केली होती.

ढुस यांच्या विनंतीवरून जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्य.) यांनी ३० ऑगस्ट रोजी शाळेला लेखी आदेश देऊन नियमानुसार समित्या स्थापन करणेस सांगितले होते. तथापी पंधरा दिवस झाले तरी शाळेने व शाळेच्या संस्थेने अस्तित्वात असलेल्या बोगस समित्या बरखास्त केल्या नाहीत व शासन निर्णय आणि शिक्षण अधिकारी यांचे आदेशाचे पालन केले नाही.


शिक्षण अधिकारी (माध्य) अहमदनगर यांचे आदेशाची व शासन निर्णयातील तरतुदींची अवहेलना केलेने उपरोक्त नियमबाह्य पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त करून नियमानुसार समित्या स्थापन करीत नाही तोपर्यंत देवळाली प्रवरा येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या गेट समोर आमरण उपोषण करणार असल्याचे आप्पासाहेब ढुस यांनी त्यांच्या निवेदनात म्हंटले असून पुढील कार्यवाही साठी या निवेदनाच्या प्रती शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक अहमदनगर, तहसीलदार राहुरी, पोलिस निरीक्षक राहुरी, अहमदनगर जिल्हा मराठाचे अध्यक्ष, सचिव आणि श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना देणेत आल्या आहेत.

Related Articles

Back to top button