अहमदनगर

निमगाव खैरी विद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल निमगांवखैरी या विद्यालयात आज ७५ व्या स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. मोरगे हाँस्पिटलचे सर्वेसर्वा कोविडयोध्दा डॉ.विनायक मोरगे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
     यावेळी संस्थेचे सहसचिव अँड जयंत चौधरी यांच्या हस्ते डॉ. मोरगे यांचा सन्मान करण्यात आला तसेच डॉ.गागरे यांचा सन्मान विद्यालयाचे मुख्याध्यापक गायके सर यांनी केला. डॉ.मोरगे यांनी विद्यार्थ्यांना कोविड १९ या साथीच्या आजाराबद्दल मार्गदर्शन करून मनातील भीती दुर करण्यासाठी उद्भोधन केले. अँड जयंत चौधरी यांनी एवढया व्यस्ततेमध्येही डॉ.मोरगे यांनी वेळ दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने ऋण व्यक्त करून सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.मोरगे व डॉ. गागरे यांच्या हस्ते विद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button