महाराष्ट्र

वन विभाग सातारा, वन परिक्षेत्र महाबळेश्वर, हिलदारी व ग्रामपंचायत माचुतर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : वन विभाग सातारा, वन परिक्षेत्र महाबळेश्वर, हिलदारी व ग्रामपंचायत माचुतर यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकार च्या “आजादी का अमृत महोत्सव” निमित्त ग्रामपंचायत माचुतर ते भालगीवाडी रोड तसेच मेढा – महाबळेश्वर रोड या भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेची सुरुवात माचुतर ग्रामपंचायतीत स्वच्छतेची शपथ घेवून करण्यात आली.
सदर स्वच्छता मोहिमेत फोरेस्ट परिसरात पडलेला एकूण २८२.४१५ किग्रॅ कचरा गोळा करण्यात आला. यात ३२.२०५ किग्रॅ प्लास्टिक च्या बाटल्या, ११६.८४५ किग्रॅ काचेच्या बाटल्या, ९६.७०५ किग्रॅ चिप्स, बिस्कीट व इतर वस्तूंची रिकामी पाकिटे, २६.४२० किग्रॅ खराब कपडे व १०.२४ किग्रॅ इतर कचऱ्याचा समावेश होता.


या मोहिमेत श्रीकांत कुलकर्णी (वनक्षेत्रपाल महाबळेश्वर), सहदेव भिसे (वनपाल महाबळेश्वर), अभिनंदन सावंत (वनरक्षक महाबळेश्वर), रमेश गडधे (वनरक्षक माचुतर), संजय कमलेकर (वनरक्षक मांघर), तान्हाजी केळगणे (वनपाल गुरेघर), रोहित लोहार (वनरक्षक गुरेघर), शिवाजी केळगणे (समिती सुपरवाझर), संजय केळगणे (संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष ), सुरेश शिंदे (सरपंच माचुतर) व ग्रामस्थ माचुतर यांनी उत्स्पुर्तपणे सहभाग नोंदविला.
हिलदारी टीम च्या डॉ. मुकेश कुलकर्णी, राम भोसले, सुजित पेंडभाजे, यासीन नालबंद, आरतीका मोरे, आकाश शिंदे, अमृता जाधव, प्रतिमा बोडरे, चैताली टोणगावकर, गणेश माचुतरे, दुर्गेश जाधव, खाक्सरअली पटेल, अभिषेक जाधव इत्यादींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button