गुन्हे वार्ता

नगर-मनमाड मार्गावरील माऊली प्लांटसमोरील ‘त्या’ हॉटेलवर अवैध दारू विक्री सुरूच

राहुरी प्रतिनिधी : गेल्या महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने लाखो रुपयांचा परराज्यातील मद्य साठा जप्त करूनही गुहा हद्दीतील नगर-मनमाड मार्गावरील माऊली प्लांट समोरील ‘ त्या’ हॉटेलवर अजूनही मद्यविकेव तेजीत सुरू आहे. याप्रश्नी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी अन्यथा शिवशंभू छावा प्रतिष्ठानच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राज्य संपर्कप्रमुख सतीश सौदागर यांनी दिला आहे.

प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात सौदागर यांनी म्हंटले की गेल्या महिन्यात गुहा हद्दीतील नगर-मनमाड मार्गावर माऊली मिल्कप्लांट समोर असलेल्या हॉटेलवर परराज्यातील सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघाना अटक केली होती. निश्चित अतिशय चांगली कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली यात शँका नाही.
मात्र या हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांच्या व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकावर टिच्चून पुन्हा अवैध दारू विक्री सुरू केली. मनाला पटेल त्या भावाने व दिवस-रात्र दारू विक्री सुरू असून या ठिकाणी दारू मिळत असल्याने त्या ठिकाणी मद्यपी बसत असून वादावादीच्या घटना घडत आहे. पोलीस अथवा राज्य उत्पादन शुल्क विभाग आपले काय करू शकत नाही? या तोऱ्यात हॉटेल चालक वागत आहे. 
तरी सदर हॉटेलवर सुरू असलेली अवैध दारू विक्री तातडीने बंद करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवशंभू छावा प्रतिष्ठानचे सतीश सौदागर यांनी दिला आहे.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button