धार्मिक

15 एप्रिल रोजी श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे “विठू नामयाचा” या दोन अंकी नाटकाचा प्रयोग

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : बालयोगी श्री सदानंद महाराज लिखित तथा संगीत दिग्दर्शित संत नामदेव महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा “विठू नामयाचा” या दोन अंकी नाटकाचा प्रयोग शनिवार, दि. 15 एप्रिल 2023 रोजी रात्री 8 ते 11 या वेळेत श्री दत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड, ता. नेवासा, जि. अ.नगर येथे श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

या नाटकाचे दिग्दर्शक उपेंद्र दाते मुंबई हे असून निर्माते मनोज राऊत हे आहेत. या नाट्य प्रयोगाच्या आयोजनासाठी बालयोगी सदानंद महाराज नाट्य मंडळ परशुराम कुंड तुंगारेश्वर पर्वत यांनी पुढाकार घेतलेला आहे. सद्यस्थितीत दूरदर्शन तथा चित्रपट गृहामध्ये यु ट्यूबच्या, मोबाईलच्या माध्यमातून अनेक मनोरंजनाची कार्यक्रम सुरू आहेत. त्यामध्ये व्यासपीठावर सादर करण्यात येणारे नाटक ही कुठेतरी कमी होताना आपणास दिसत आहेत. त्यातही संगीत नाटक व नाटकाचा विषय अध्यात्मशी निगडीत ही बाब अपवादानेच बघायला मिळते.

पंजाब प्रांतात घुमान येथे बालयोगी सदानंद महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला होता. त्या ठिकाणी या नाटकाचा पहिला प्रयोग संपन्न झाला व त्यास रशिक श्रोत्यांचा उदंड असा प्रतिसाद लाभला. भागवत धर्मामध्ये नामदेव महाराजांचे कार्य हे मोठं आहे. नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती सर्वश्रुत आहे व भागवत धर्माची पताका नामदेव महाराजांनी पंजाब पर्यंत घेऊन जाणारे संत म्हणून नामदेव महाराज ख्यातकीर्त आहेत.

संत परंपरेतील या संतांविषयी अध्यात्म परंपरेतील साधकांना मोठी श्रद्धा आहे. या श्रद्धेचा आदर करतच श्री दत्त मंदिर संस्थानचे महंत पूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी पुढाकार घेत या नाट्य प्रयोगाचे आयोजन श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे केलेले आहे. या संगीत नाटकासाठी सर्व पूजनीय संत, महंत महाराज मंडळी अध्यात्म परंपरेवर प्रेम करणारी मंडळी, साधक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व अध्यात्म प्रेमींनी लाभ घ्यावा आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आलेले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button