गुन्हे वार्ता

गाढेगाव खून प्रकरणी मुख्य सूत्रधार पाचवा आरोपी जेरबंद

पैठण : तालुक्यातील गाढेगाव येथील शेतीच्या वादातून माजी सरपंच कांताराव श्रीपती शिंदे (वय ४८ वर्ष, रा. गाढेगाव ता. पैठण) यांचा पाच जनांनी मिळून औद्योगिक वसाहतीच्या म्हसोबा पुलाजवळ निर्घृण खून केल्याची घटना २ एप्रिल २०२१ रोजी रात्रीच्या वेळी घडली होती. याप्रकरणातील फरार असलेला मुख्य सुत्रधार अखेर बिडकीन पोलिसांनी जेरबंद केला आहे.

या खून प्रकरणानंतर यातील सर्वच आरोपी पसार झाले होते. मात्र पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत अनील दिलीप केदारे, राजेंद्र प्रभाकर केदारे, अनिल अशोक केदारे, व संजय मनोहर केदारे या चार आरोपींना तात्काळ जेरबंद केले होते. तेंव्हापासून हे चारही आरोपी हर्सूल कारागृहात शीक्षा भोगत आहेत. मात्र मुख्य सूत्रधार किरण पेतराज केदारे हा आरोपी साडेपाच महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. नुकतीच (दि.१७ सप्टेंबर रोजी) बिडकीन पोलिसांनी मोठ्या शिताफिने त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

या खुनातील सर्व आरोपींवर ३०२, २०१, १२० (ब) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुख्य सूत्रधार किरण पेतराज केदारे हा नुकताच पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून त्याचा पीसीआर संपत असुन आज बुधवारी दि. २२ रोजी त्याला पैठण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेचा पुढील तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्ष संतोष माने व इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी करत आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button