अहमदनगर

धांदरफळ गटातील नागरिकांनी केला महसूलमंत्री ना. थोरातांचा सत्कार

संगमनेर शहर/आशिष कानवडे : महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून विशेष रस्ते दुरुस्ती अंतर्गत खांडगाव फाटा, निमज, धांदरफळ खु., निमगाव खु., सावरचोळ या रस्त्यासाठी ४५० लक्ष रुपये मंजूर केल्या बद्दल ना.बाळासाहेब थोरात यांचा धांदरफळ गटातील नागरिकांच्या व आर.एम.कातोरे मित्र मंडळ धांदरफळ गट यांच्या वतीने आभार मानले आहे.
तुकारामशेठ डोंगरे यांनी त्यांच्या झेंडु च्या बागेत काढलेलं छायाचित्र फ्रेम बनवून नामदार थोरातांना भेट दिली व यावेळी सन्मान सत्कार करण्यात आला.
त्या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य तथा नियोजन समिती अहमदनगरचे आर. एम. कातोरे, शेतकी संघाचे व्हा. चेअरमन संपतराव डोंगरे, रामनाथ शेठ डोंगरे, रोहिदास खताळ, सतिष पाटील खताळ, नवनाथ कातोरे, अरूण गुंजाळ, व्यंकटेश देशमुख, शरद कोकणे, मंगेश मतकर, सागर डोंगरे, पंडित कातोरे, संदीप ठोंबरे, अनंत कातोरे, सुभाष कातोरे, धांदरफळ गटातील मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button