अहमदनगर

इंजि. अतुल राणेंनी दिला माजी विद्यार्थी संघटनेला एक लाखाचा धनादेश

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठास भेट
राहुरी शहर/ अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले अमेरीकेतील एल. ॲण्ड टी इन्फोटेकचे संचालक इंजि. अतुल राणे, इंजि. डी.टी. परदेशी व इंजि. विजय वाकळे यांनी नुकतीच महात्मा फुले कृषि विद्यापीठास भेट दिली.
यावेळी त्यांना विद्यापीठात होत असलेल्या हवामान बदल तसेच कृषि अभियांत्रिकीमध्ये होत असलेल्या आधुनिक संशोधनाबद्दलची माहिती कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली. यावेळी इंजि. अतुल राणे यांनी माजी विद्यार्थी संघटनेला त्यांच्या कार्याला मदत म्हणुन रु. एक लाखाची देणगी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्याकडे सुपुर्द केली.
याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी डॉ. विक्रम कड यांनी संघटनेकडून सुरु असलेल्या डिजीटल व्हीलेज, विद्यार्थी-औद्योगीक संस्था इंटरफेस कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासाबाबत राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी मान्यवरांनी डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, काढणी पश्चात तंत्रज्ञान केंद्र व बेकरी युनिटला भेट देवून माहिती घेतली.
यावेळी  निम्न कृषि शिक्षणचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, अन्नशास्त्र तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण व डॉ. विक्रम कड यांनी माहिती दिली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Related Articles

Back to top button