सामाजिक
देवळाली प्रवरा येथे स्व.प्रफुल्ल दळवी यांच्या जन्मदिनानिमित्त उद्या रक्तदान शिबिर
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील प्रफुल्ल दळवी यांचे गेल्या काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून मित्र परिवाराच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
देवळाली प्रवरा येथील विश्वकर्मा चौक येथे उद्या मंगळवार दि. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८ ते ११ या दरम्यान स्व.प्रफुल्ल दळवी यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.
तरी रक्तदान शिबीरात तरुणांनी सहभाग नोंदवून रक्तदान करावे असे आवाहन स्व. प्रफुल्ल दळवी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.