अहमदनगर

पवित्र मारिया सुभक्तीचे उत्कृष्ट पात्र : फा. सचिन मुन्तोडे

श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : संत तेरेजा हरिगाव मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रापूर्व सहावा शनिवार नोव्हेना भक्तिमय वातावरणात शासकीय आदेश पाळून संपन्न झाला. शनिवारच्या नोव्हेनाप्रसंगी रे फा. सचिन मुन्तोडे प्रतिपादन केले की, आज आपण मोठ्या भक्तिभावाने पवित्र मातेच्या सन्मानार्थ नोव्हेनामध्ये भाग घेत आहोत. सर्वप्रथम आपण देवाचे आभार मानू या. त्याने स्वत:चा एकुलता एक पुत्र परमेश्वराने भूतलावर पाठविले आहे. प्रभू येशूने प.मारीयेच्या उदरी जन्म घेतला आहे. पवित्र मरीयेवर आज मनन चिंतन करताना तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू या. देवाने पवित्र मरीयेची निवड केली आहे ती उत्तम आहे. तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या शेवटपर्यंत तिने खंबीर साथ दिली. ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे व प्रत्येकाला मार्गदर्शन करीत असते. जेंव्हा आपण आईचे प्रेम घेतो तसे तिचे प्रेम व वात्सल्य आहे. पवित्र मरिया तर स्वर्गीय माता आहे.ती स्त्रियांमध्ये धान्य आहे. तिची माया वात्सल्य हेच तिच्याकडे आकर्षित करतात. आपण त्याचा अनुभव घेत आहोत. पवित्र मारिया हे सुभक्तीचे उत्कृष्ट पात्र आहे. ते परमेश्वराने निवडलेले पात्र आहे. प.मरिया भक्तीने पूर्णत: भरलेली होती. म्हणून ते सुभक्तीचे पात्र आहे. ती नितीचा आरसा आहे. परमेश्वराची अपेक्षा असते मानवाने नितीने वागावे, दयेने वागावे, प्रभूसमोर नम्रतेने चालावे. नितीमान मनुष्य न्यायी असावा. न्याय व निती हे धार्मिक सद्गुण आहेत. मरीयेठायी प्रभू येशूच्या रूपाने देव जो स्वत: नितीमान आहे. तो वस्ती करू लाागला म्हनुनच तिच्या ठायी खऱ्याखुऱ्या नितीमत्वाचे प्रतिबिंब पहावयास मिळते. याच अर्थाने प.मरिया नितीचा आरसा आहे. तिला स्वर्गाचा दरवाजा संबोधिले जाते. मरीयेकडे आल्यावाचून स्वर्गाकडे कोणी जाऊ शकत नाही. मनुष्याचे तारण व्हावे हि देवाची इच्छा आहे. म्हणून तो विविध मार्गांनी स्वर्गाचे दर उघडतो. प.मरीयेचा जन्म सुद्धा मानवाच्या तारणाची मंगल पहाट होती. कारण तिच्या द्वारे प्रभू येशू भूतलावर अवतरला. प्रभू येशू ख्रिस्त हा शांतीचा राजपुत्र असल्यामुळे प.मरिया शांतीची राणी व सम्राज्ञी म्हणतात. मरीयेप्रमाणे आपल्याला पावित्र्याचा व नितीमत्वाचा ध्यास लागणे गरजेचे आहे. प,मरीयेप्रमाणे आदर्श जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा.ती सदैव आपल्या बरोबर आहे.आम्हा सर्वाना तिच्या पावित्र्याची सत्विकतेची तहान भूक लागावी म्हणून तिच्या मध्यस्थीची याचना करू या. या नोव्हेनाप्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ सहभागी होते. येत्या सातव्या शनिवारी नोव्हेनाप्रांगी फा विल्सन गायकवाड यांचे प्रवचन होईल.२८ ऑगस्ट रोजी फा.ज्यो गायकवाड यांचे प्रवचन होईल.

Related Articles

Back to top button