अहमदनगर

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवा : अशोक अन्हाड; शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना शिक्षक भारतीचे निवेदन

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाउपाध्यक्ष अशोक अन्हाड, उच्च माध्यमिकचे सरचिटणीस महेश पाडेकर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद समी शेख, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा कार्यवाह संजय भुसारी, जिल्हा समन्वयक योगेश हराळे आदी पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात निवेदन देऊन सहविचार सभा लवकर लावावी असे सांगितले.


जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात सहविचार सभा आयोजित करून प्रश्न सोडवावे, या विविध प्रश्नांसंदर्भात शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिक चे सरचिटणीस महेश पाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात माध्यमिक, उच्चमाध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांमध्ये अनेक महिन्यांपासून प्रलंबित मेडिकल व थकीत बिले मंजूर करावी , निवड व वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव मंजूर करावा व प्रशिक्षण आयोजित करावे, महिन्याच्या एक तारखेला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावीत, 20 टक्के व 40 टक्के अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी क्रमांक व ड्राप त्वरित द्यावा, सातवा वेतन आयोग दुसरा फरक हप्ता दिवाळीपूर्वी द्यावा, राष्ट्रीय पेन्शन योजनेतील ऑनलाईन हिशोब त्वरित द्यावा, सातवा वेतन आयोगाची वेतन निश्चिती तालुकानिहाय शिबिर लावून करण्यात यावे, सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावे, सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी ,डीएड टू बीएड शिक्षकांच्या पदोन्नत्या त्वरित द्याव्यात, पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी आदी प्रश्नांचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनाला माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, उपाध्यक्ष  रामराव काळे, सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल चंदनशिवे, माध्यमिक सोसायटीचे संचालक कैलास रहाणे, मफीज इनामदार, सचिन लगड, अमोल वर्पे, रूपाली बोरुडे, रुपाली कुरूमकर, श्याम जगताप, प्रवीण मते, संजय तमनर, ज्ञानेश्वर काळे, सोमनाथ बोनंतले, दत्तात्रय घुले, संजय पवार, राजेंद्र जाधव, सुदाम दिघे, संभाजी पवार, संतोष शेंदूरकर, कैलास जाधव, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर शेख, सुदर्शन ढगे, संतोष देशमुख आदी पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला.

Related Articles

Back to top button