कृषी

दुध दर वाढीबाबत क्रांतीसेना आक्रमक

 राहुरी : कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.शेतमालाला भाव भेटत नाही तसेच जोडधंदा असलेल्या दुधाला दर मिळत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी, दुध उत्पादक उद्धवस्त होतील. जर दुध खरेदी करणार्या ग्राहकांचा दुध दर कमी झालेले नाहीत, मग शेतकर्यांकडून कमी दरात दुध का खरेदी केली जात आहे, असा प्रश्न  शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे.शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी दुधाला किमान ३० रुपये दर देण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे,अशी माहिती प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी दिली आहे.
     अहमदनगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग सुरु झाल्यापासून दुधाला मागणी नाही असे सांगत खाजगी दुध संघांनी प्रती लिटरमागे दहा ते बारा रुपये दर कमी केले आहेत. मात्र सध्याच्या उत्पादन खर्चाचा विचार करता हे दर परवडणारे नाही. सध्याच्या परिस्थितीत जनावरे संभाळणेही अवघड झाले आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकर्यांना बसत आहे. त्यामुळे खाजगी संघांनी दुधाला किमान ३० रूपये प्रति लिटर दर द्यावा व मागील चार महिन्यात कमी केलेल्या दराचा फरक देण्याबाबत आपण दुध संघांना आदेश देऊन मेटाकुटीला आलेल्या शेतकरी, दुध उत्पादक यांच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ,संघटक जालिंदर शेडगे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नवनाथ ढगे, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, राहुरी तालुका अध्यक्ष संदीप उंडे,शेखर पवार, सचिन गागरे, महेश तनपुरे,शाम कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button