शिक्षणवारी ज्ञान पंढरी

सात्रळ महाविद्यालयाची स्वयंसेविका शुभांगी शिंदे हिचे प्रजासत्ताक दिन पूर्व संचलन निवड चाचणीत यश

राहुरी | बाळकृष्ण भोसले – तालुक्यातील सात्रळ येथील लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका शुभांगी शिंदे हिने राज्य व देश पातळीवर होणाऱ्या NRD/SRD निवड चाचणीसाठी कोल्हापूर येथील शिबीरामध्ये सहभागी झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी दिली.
यापूर्वी अहमदनगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी मधून महाविद्यालयाचा स्वयंसेवक उद्धव लोंढे व स्वयंसेविका शुभांगी शिंदे यांनी घवघवीत यश मिळवत पुणे येथे होणाऱ्या निवड चाचणीसाठी पात्र झाले होते. पुणे येथे पार पडलेल्या निवड शिबिरामध्ये उद्धव लोंढे व शुभांगी शिंदे यांनी सहभाग नोंदवत, शुभांगी शिंदे हिने यश मिळत महाविद्यालय व पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत कोल्हापूर येथे होणाऱ्या निवड चाचणी शिबिरासाठी ४४ स्वयंसेवकांसोबत सहभागी झालेली होती. २६ जानेवारी रोजी राजपथ दिल्ली येथे जे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे पथसंचलन होते ते महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.
शुभांगीच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी जि.प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो (डॉ.) पी. एम. डोंगरे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. डी. एन. घोलप, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रोहिदास भडकवाड, डॉ. निलेश कान्हे, सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Back to top button