औरंगाबाद

दिन्नापुरला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करा


दिन्नापुर पक्का रस्ता मागणी समितीची मंत्री भुमरे यांच्याकडे निवेदनातून मागणी

◾लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, मंत्री भुमरे यांचे आश्वासन

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील दिन्नापुर गावांसाठी स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी ओलांडली तरी अद्याप पक्का डांबरी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांना दळणवळणासाठी तसेच वैद्यकीय सेवेसाठी नरकयातना भोगाव्या लागत आहे. या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन नेमलेल्या दिन्नापूर पक्का रस्ता मागणी समितीच्या वतीने लोहगाव- दिन्नापुर-ढोरकीन या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे. यासाठी कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांची (दि.२७) रोजी औरंगाबाद येथील संपर्क कार्यालयात भेट घेऊन रस्त्याची व्यथा मांडत निवेदन सादर केले.

नुकतीच दिन्नापुर पक्का रस्ता मागणी समितीने मंत्री भुमरे यांची भेट घेऊन दिन्नापुरला जोडणाऱ्या सर्व रस्त्याची झालेली दयनीय अवस्थेची व्यथा मांडली. यावेळी समितीशी बोलताना मंत्री भुमरे यांनी आश्वासन दिले कि शेवता, ढाकेफळ, खाम जळगाव, दिन्नापूर कवडगाव या गावांना जोडणारा रस्ता मंजूर असून मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत येणाऱ्या दर्जोन्नती योजनेअंतर्गत येत्या डिसेंबर २०२१ पर्यंत या कामाला आर्थिक तरतूद झाल्यानंतर काम सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लोहगाव ते दिन्नापूर या रस्त्याच्या तीन किलोमीटर कामास मंजुरी मिळालेली असून पावसाळा संपल्यानंतर हे काम सुरु होईल.

दिन्नापुर ते ढोरकीन या रस्त्याचेही तीन किलोमीटर काम मंजूर असून पावसाळा संपल्यानंतर या कामासही सुरुवात करण्यात येईल असाही शब्द मंत्री भुमरे यांनी दिला. निवेदन देताना दिन्नापूर पक्का रस्ता मागणी समितीचे सर्व पदाधिकारी व गावातील तरुण मंडळी उपस्थित होते. रस्त्यांच्या डांबरीकरणाबाबत प्रत्यक्ष भेटून वेळ दिल्याबद्दल व समस्या जाणून घेतल्याबद्दल कॅबिनेट मंत्री भुमरे यांचे सर्व दिन्नापुर ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button