औरंगाबाद

दादेगांव हजारे येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

 
विलास लाटे/पैठण : भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालय दादेगांव हजारे येथे महान विभूतींच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प वाहून जयंती साजरी करण्यात आली.

महात्मा गांधींनी अहिंसा, सविनय, या मार्गाने अनेक सत्याग्रह करुन इंग्रजांना नामोहरम केले. त्यांच्या विचारांची प्रेरणा जगातील अनेक पारतंत्र्यातील देशांनी घेऊन, इंग्रजांच्या वसाहत वादाविरुध्द लढा दिला. स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री. मूर्ती लहान पण कीर्ती महान. भारत हा कृषीप्रधान देश आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या हिताची कृषी धोरण राबवले. तसेच सैनिक देशाचे रक्षक आहेत .म्हणून “जय जवान जय किसान” हा नारा देऊन चीनला सुद्धा धूळ चारली होती. या महान विभूतींच्या जयंतीदिनी ग्रामपंचायत दादेगांव हजारे येथे अभिवादन करण्यात आले.                          

यावेळी सरपंच मनिषा अनिल हजारे, उपसरपंच सुरेश हजारे, पोलीस पाटील जनाबाई गहाळ, सदस्य उषा हजारे, अर्चना हजारे, भाऊसाहेब हजारे, अनिल हजारे, उद्धव हजारे, महादेव हजारे, संपत झिने, प्रल्हाद गहाळ, सोमनाथ माळी, रामकिसन हजारे, संतोष हजारे, देविदास हजारे, बंन्सी झिने, रावसाहेब गहाळ, अरुण भुकेले, कैलास गहाळ, संदिप हजारे, संभाजी हजारे, ज्ञानदेव उघडे, फेरोज पठाण, बद्री हजारे, शेषराव झिने, रामकृष्ण हजारे, ओम हजारे, रवि शिंदे, बळीराम हजारे आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button