औरंगाबाद

दादेगांव हजारे येथे नुकसानग्रस्त पिकांची मंत्री भुमरे यांनी केली पाहणी

विलास लाटे/पैठण : अतिवृष्टीमुळे दादेगांव हजारे येथील नारायण हजारे, भाऊराव बारे व भाऊसाहेब हजारे या शेतकऱ्यांच्या शेतात पाऊसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या फळबागांचे व पिकांचे झालेल्या नुकसानीची (दि.१२)  रोजी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी पाहणी केली.

गेल्या आठवड्यात तालुक्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवला. या मुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  मुसळधार पाऊसाने दादेगाव येथील कल्याण हजारे, रत्नाकर गव्हाणे, विष्णू कुमावत या शेतकऱ्यांच्या बांधलेल्या विहिरी पूर्ण पणे खचल्याने मोठे नुकसान झाले असून भविष्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. तसेच दादेगाव येथील सावता वस्तीला जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पूर्णपणे वाहून गेल्याने या वस्ती वरील नागरिकांचा दादेगावशी संपर्क तुटला आहे. येथील नागरिकांना पायी प्रवास करावा लागत आहे. दादेगांव ते कुतूबखेडा शिव रस्त्यांवरील नदीवर पुल बांधण्याची मागणी शेतक-यांनी केली. दादेगाव येथील नदी लगतच्या शेतकऱ्यांचे पिक पाण्याखाली गेल्याने मोठं नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त पिकाची मंत्री भुमरे यांनी पाहणी केली असून सर्व नुकसानीचे पंचनामे त्वरीत करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत.

यावेळी नंदकुमार पठाडे, अनिल हजारे, रामकिसन चितळे, डी डी जाधव, सुरेश हजारे, महादेव हजारे, उद्धव हजारे, सुरेंद्र गव्हाणे, रत्नाकर गव्हाणे, आबासाहेब हजारे, पांडुरंग हजारे, संतोष हजारे, देविदास हजारे, गणेश गव्हाणे, मच्छिंद्र गव्हाणे, जगन्नाथ आढाव, गणेश गहाळ, मुरली गहाळ, संपत झिने, सचिन झिने, ऋषी कुमावत, सचिन हजारे, धर्मराज हजारे, नारायण बारे, मनोज हजारे आदीसह नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

दादेगांव बु व खुर्द येथे जोरदार पावसामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले असून सावतावस्ती पुल वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. दादेगांव खुर्द ते कुतूबखेडा शिव मधिल नदिवर पुल बांधण्यात यावा व शेतीपिकांसह विहीरीचे पंचनामे लवकर करुन नुकसान भरपाई द्यावी.

~ सौ. मनिषा अनिल हजारे – सरपंच

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button