अहमदनगर

रुग्नाभ्यंग संस्काराने नवजीवन,नवचैतन्य प्राप्त होते : फा.संतोष साळवे

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : हरिगाव येथील मतमाउली जन्मोत्सव यात्रापूर्व शेवटच्या नोव्हेनाचे पुष्प गुंफताना फा संतोष साळवे सेंट जोसेफ चर्च कुर्ला यांनी प्रतिपादन केले की आज मनन चिंतनसाठी विषय आहे”रुग्नाभ्यंग संस्कार”देवाचा अवतार आपल्या सर्वांमध्ये उतरलेला आहे. आज आपण पवित्र मातेच्या सन्मानार्थ जमलो आहोत. आजारी, रुग्ण व्यक्तींना आपण जो संस्कार देतो व त्या संस्काराला म्हणतात रुग्नाभ्यंग संस्कार. 


रुग्नाभिषेक त्यावर मनन चिंतन करीत आहोत. रुग्णाला दिलेला आशीर्वाद, हा पवित्र साक्रामेंत कशासाठी दिला जातो, आपली धारणा आहे विचार आहेत ह्या आजारी माणसाला साक्रामेंत दिला तर पटकन मरतो तर तो गैरधारणा दूर करून त्या साक्रमेंताव्दारे जे आजारी आहेत त्यांना ताकद व बळ मिळते. शक्ती सामर्थ्य मिळते. नवजीवन मिळून नवचैतन्य प्राप्त होते. तेलाच्या अभ्यंग व्दारे अभ्यंग करणे अभिषिक्त करणे, आरोग्य प्राप्त होते. परमेश्वर त्यांच्या पापांची क्षमा करतो. त्या उद्देशाने हा पवित्र संस्कार देऊळमातेमध्ये ख्रिस्तसभेत दिला जातो. जेंव्हा धर्मगुरू हा संस्कार देतात. लोक बिछान्याला खिळलेले असतात. वेगळ्या स्थितीत असतात संस्कार देताना पहिली पायरी आहे पश्चातापाची, पश्चाताप करा, आपण देहाची मनाची तयारी करीत असतो तर येशूला स्वीकारण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी, पवित्र होण्यासाठी या साक्रामेंत व्दारे व विशेष करून सर्व प्रथम येशूने सांगितले पश्चाताप करा, प्रायश्चित्त करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आपण स्वर्गाच्या राजाच्या जवळ पोहोचलो आहोत. प्रभूवर विश्वास ठेव शुभ वर्तमानावर विश्वास ठेव, दुसरी पायरी पश्चताप, तुमची पापे एकमेकांना सांगा आणि त्यातून तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. प्रथम पश्चाताप करणे, दुसरे पाप स्वीकारणे, तिसरे म्हणजे ख्रिस्तशरीर घेणे, प्रभू येशूने सांगितले स्वर्गातून उतरलेली भाकर मीच आहे. तो जो खातो त्याला सर्वकालीन जीवन प्राप्त होईल. जो माझ्याकडे येतो त्याला भूक लागणार नाही, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला तहान लागणार नाही. धर्मगुरू या व्यक्तीला, स्त्रीला पुरुषाला अभ्यंग करतात तेलाचा अभिषिक्त करतात या तेलाव्दारे या व्यक्तीला आरोग्य प्राप्त होते. त्याला नवचैतन्य प्राप्त होते. नवीन जीवनाला हुरूप, शक्ती मिळण्यासाठी हा संस्कार दिला जातो. म्हणून या देवाच्या वचनावर विश्वास ठेवणे आपल्या सर्वाना गरजेचे आहे.

आज कोरोनाच्या काळात देवाच्या शब्दात ताकद आहे, आरोग्य आहे, देवाची वचने आत्मा व सत्य आहेत. येशूला झालेल्या जखमांनी, फटक्यांनी, घावांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. या देवाच्या वचनाव्दारे आपण स्वत:साठी आरोग्य मिळवू शकतो. आपण ज्या प्रमाणे पवित्र मारिया म्हणाली तुझ्या शब्दाप्रमाणे मला होवो आणि आम्ही सर्व ख्रिस्ती धर्म बंधू व भगिनी आम्ही येशूला सांगत आहे तुझ्या शब्दाप्रमाणे मला घडो. हे करण्यासाठी देवाची कृपा व मदत मागू या. प. मारिया सांगते की तो सांगते ते करा. ती प्रेमळ आई आहे ती प्रभू येशूकडे घेवून जाते. तिचा आदर करणे सन्मान करणे गरजेचे आहे. नोव्हेनाप्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, व्हिक्टर बोर्डे, हरिगाव भूमिपुत्र नवगुरुदीक्षित जीवन येवले, डॉमनिक रिचर्ड, सचिन मुन्तोडे उपस्थित होते. ११ सप्टेंबर रोजी महागुरूस्वामी लूरडस डानियल यांचे पवित्र मरिया जन्मोत्सव निमित्त सणाचा मिस्सा व प्रवचन होईल. शुक्रवारपासून तालुका पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व सहकारी शिंदे पवार आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ग्रामपंचायत उंदिरगाव सरपंच सुभाष बोधक व हरिगाव सरपंच मंदाकिनी गाडेकर व सर्व ग्रा.प सदस्य तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपूर यांच्या सूचनांचे पालन करून दक्षता घेत आहेत. प.मरिया जन्मोत्सव कार्यक्रम कोरोना प्रादुर्भाव असल्याने हे ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात येणार आहे. भाविकांनी घरीच राहून दर्शन, भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button