दादेगांव येथिल पडझड झालेल्या घरांची पाहणी.
विलास लाटे/पैठण : तालुक्यातील दादेगांव बु खुर्द येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असुन झालेल्या पावसामुळे अनेक नागरीकांच्या घराची पडझड होवून मोठे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची सरपंच मनिषा अनिल हजारे, ग्रामसेवक राजू दिलवाले, उपसरपंच सुरेश हजारे, सदस्य उषा हजारे, अर्चना हजारे यांनी पाहणी केली. सदर पडझडीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करत लवकरात लवकर घरांची पडझड झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.
यावेळी चंद्रकला हजारे, सुशिलाबाई जगदाळे, साखरबाई येरे, रत्ना गहाळ, अनिल हजारे, महादेव हजारे, उद्धव हजारे, प्रकाश हजारे, विजय येरे, कृष्णा गहाळ, संतोष हजारे, गणेश हजारे, देविदास हजारे, दिंगबर येरे, दिपक भवरे, विष्णु हजारे, भागवत हजारे, अशोक भुकेले, विनोद हजारे, रामकिसन हजारे, रामकृष्ण हजारे, महेश हजारे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.