अहमदनगर

तालुक्यात लवकरच जैविक इंधन निर्मिती प्रकल्प

तांदुळवाडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष सागर घुगरकर, ह.भ.प महेश महाराज खाटेकर, पत्रकार विनीत धसाळ आदी.
आरडगांव प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यात लवकरच जैविक इंधन निर्मिती प्रकल्प उभारला जाणार असल्याने हा प्रकल्प भविष्यात शेतकर्यांना वरदान ठरणार आहे,असे प्रतिपादन राहुरी आरगॅनिक्सचे अध्यक्ष सागर घुगरकर यांनी केले.
      घुगरकर पुढे म्हणाले केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे अशा स्वरुपाचे प्रकल्प निर्मितीचे स्वप्न महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात होणार असुन राहुरी तालुक्यात दहा हजार सभासद झाल्यानंतर ह्या जैवइंधन निर्मिती प्रकल्प लवकरच उभारला जाणार असल्याचे बोलले.यासाठी प्रत्येक सभासद शेतकऱ्यांना हत्ती गवताच्या जातीतील सुपर नेपियर गिन्नी गवत विकसीत वाणाचे बियाणे मोफत स्वरुपात दिले जाणार आहे. या गिन्नी गवतापासुन ९० दिवसात एकरी ४० ते ५० टनाचे उत्पादन मिळते. गिन्नी गवत शेतकऱ्यांकडून एक हजार रुपये टनाप्रमाने खरेदी केले जाईल. कमी खर्चात एकरी २ लाख रुपये उत्पादन मिळते. या माध्यामतुन शेतकर्याला वार्षिक डिवीडन वाटप, गॅस मध्ये डिस्काउंड,मोफत खते असे अनेक फायदे असल्याने हा प्रकल्प शेतकर्यांना वरदायी ठरणार आहे. या प्रकल्पातुन बेरोजगारांना रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात बैठकी होऊन शेतकर्याना मार्गदर्शन करण्यात येत आहे. तालुक्यात ठिकठिकाणी शेतकरी बैठका घेण्यात आल्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button