औरंगाबाद

ढाकेफळ येथे अ.भा.छावा संघटनेच्या वतिने शिवजयंती उत्साहात साजरी


पैठण : तालुक्यातील ढाकेफळ येथे शनिवारी (दि.१९ फेब्रुवारी) अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छावाचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, छञपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला होता. ढाकेफळसह पंचक्रोशितील शिवभक्तांनी सकाळपासुनच अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्स ठेवत अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाअध्यक्ष किशोर शिरवत, संजय मरकड, हारी‌ तात्या शिसोदे, विकास शिसोदे, ज्ञानदेव शिरवत, पाडुरंग शिरवत, मुकुंद शिरवत, अक्षय शिरवत, अमोल आव्हाड, संदीप शिरवत, भगवान सोलाट, संकेत शिदे, महेश शिंदे, भारत शिरवत, जालिदर एरंडे, योगेश शिरवत, रविंद्र कोल्हे, महेंद्र वंजारे, भारत शिरवत, सुमित शिरवत, इम्रान पठाण, विकास भागवत आदींची उपस्थिती होती.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button