औरंगाबाद

डोणगाव येथे तिज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील डोणगाव (दि.१६) येथील सेवालाल महाराज मंदिरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तिज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. नवरात्रीचे नऊ दिवस तिज पूजन करून नवव्या दिवशी तिज विसर्जन मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. तिज विसर्जनासाठी डोणगाव पंचक्रोशीतील नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. नऊ दिवस वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. रोज वेगवेगळ्या भक्तांकडून प्रसाद वाटल्या जात होते.

शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते डॉ.कृष्णा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व आॅल इंडिया बंजारा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने गावातील संत सेवालाल महाराज मंदिरात कायम विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. विविध जयंती, सत्कार व भजनाचे नियोजन कायम केल्या जात आहे. या श्रृंखलेतच तिज उत्सव ही मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. 

सदरील उत्सव यशस्वी करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ तालुका अध्यक्ष अविनाश जाधव, विकास नंदलला राठोड, प्रताप कल्याण राठोड, नायक अनिल जाधव, कारभारी हिरामण जाधव, बाबू जाधव, दिलीप जाधव, गोरख जाधव, ज्ञानेश्वर राठोड, संजय राठोड, प्रकाश राठोड, राजू जाधव, विशाल राठोड, अक्षय चव्हाण, बबलू चव्हाण, करण जाधव, संतोष जाधव, भारत चव्हाण, काकासाहेब जाधव, राम जाधव विनोद, बाबा जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button