सामाजिक
डॉ राजीव डोंगरे हे सेवाभावी वृत्ती जपणारे- कैलास पवार
औरंगाबाद/विलास लाटे : वैजापूर येथील डॉ. राजीव डोंगरे हे गेल्या अनेक वर्षापासून समाजात वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सेवाभावी वृत्ती जपत वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून मनापासून तळमळीने वैद्यकीय सेवा देत डॉ. राजीव डोंगरे व सौ डॉ. डोंगरे हे आज उत्कृष्टरित्या कार्य करित आहे. 6 नोव्हेंबर रोजी डॉ. राजीव डोंगरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने तसेच खंडाळा येथील ग्रामस्थांच्या वतीने डॉ. डोंगरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी डॉ. डोंगरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आज रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. त्याचबरोबर रात्री- अपरात्री रुग्णांची अडचण समजून घेत योग्य वेळेत रुग्णाला उपचार देणे हीच खरी वैद्यकीय क्षेत्रात आज गरज असल्याचे मत डॉ. राजीव डोंगरे यांनी व्यक्त केले. यावेळी कैलास पवार यांनी सांगितले की डॉ. डोंगरे यांची कोरोनाच्या काळातील वैद्यकीय सेवा हि रुग्णांसाठी अग्रगण्य स्थानी होती.
याप्रसंगी उपस्थित भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलास पवार, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजेंद्र जानराव, खंडाळा ग्रामपंचायत सदस्य दिनकर भाऊ मगर, सामाजिक कार्यकर्ते बाबुराव मगर ,वाल्मीक मगर व ईतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.