अहमदनगर

प्रवरेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी बेंगलुरू येथे निवड

प्रवरेचा विद्यार्थी प्रशिक्षणासाठी बेंगलुरू येथे रवाना…

लोणी (राहाता) : शैक्षणिक व औद्योगिक शिक्षणाचा दुवा साधता यावा, या हेतूने सुरू केलेल्या उपक्रमाअंतर्गत लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी आदित्य सुधिर जोंधळे याची थॉमस बॉयोटेक & सायटोब्याक्टस सेंटर फ़ॉर बायोसाइन्सेस, बेंगलुरू येथे सहा महिण्याच्या संशोधन प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे यादरम्यान त्याला प्रति महा. रु.५,०००/- संशोधन फेलोशिप मिळणार आहे, 
तसेच वरील प्रशिक्षणासाठी थॉमस बॉयोटेक & सायटोब्याक्टस सेंटर फ़ॉर बायोसाइन्सेसचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाईओस थॉमस अश्या जगप्रसिद्ध वैज्ञानिकाचे पपईच्या झाडाचे उती संवर्धन या विषयावर मार्गदर्शन मिळणार असल्याची माहिती महाविद्यायचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक प्रा.महेश चंद्रे यांनी दिली. सदर विद्यार्थी प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ञ समिती यांच्या समोर मांडणार आहे.
या विद्यार्थ्याचा यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त अण्णासाहेब म्हस्के, सहसचिव भारत घोगरे, संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे आणि इतर शिक्षकांनी अभिनंदन केले.
तसेच सदर विद्यार्थ्यांला महाविद्यालयातील प्रा.भाऊसाहेब घोरपडे, प्रा.अमोल सावंत, प्रा.स्वप्नील नलगे, डॉ.विशाल केदारी, प्रा.प्रवीण गायकर, डॉ.अमित अडसूळ, प्रा. सौ.मिनल शेळके, प्रा.श्रद्धा रणपिसे, प्रा.गाढे स्वरांजली यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button