अहमदनगर

डिग्रसच्या शिष्टमंडळाने घेतली खा.विखेंची भेट

राहुरी विद्यापीठ : डिग्रस व विद्यापीठ परिसरातील मुख्य रस्ते विद्यापीठ प्रशासनाकडुन बंद केले जात असल्याने डिग्रस ग्रामपंचायत सदस्यांच्या शिष्टमंडळाने खा.सुजय विखेंची भेट घेत निवेदन दिले आहे.

    सविस्तर वृत्त असे की, विद्यापीठ प्रशासनाकडुन डिग्रस परिसरातील अंतर्गत रस्ते,विद्यापीठ डिग्रस मुख्य रस्ते बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे.या विषयासंबंधी कुलगुरु यांना भेटण्यासाठी डिग्रस ग्रामपंचायत सदस्य गेले.परंतु कुलगुरूंना भेटण्यास विद्यापीठ प्रशासनाकडुन वेळ दिली गेली नाही.विद्यापीठ प्रशासनाकडुन राबविण्यात येत असलेल्या विद्यापीठ डिग्रस मुख्य रस्ते बंद करण्याच्या मोहीमेवर तोडगा काढण्यासाठी डिग्रसच्या शिष्टमंडळाने खासदार सुजय विखे यांची भेट घेत ग्रामस्थांच्या समस्याचे निवेदन सादर केले आहे.संबधीत विषयावर खा. सुजय विखेंनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु यांना दुरध्वनी करुन योग्य तो मार्ग काढण्याच्या सुचना केल्या आहेत.या शिष्टमंडळात डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे, गोरक्षनाथ देशमुख, अविनाश भिंगारदे, क्रांतीसेनेचे संदिप ओहोळ, दत्तात्रय महानोर, संजय पवार आदींचा सहभाग होता.

Related Articles

Back to top button