अहमदनगर

डाॅ.अंबादास मेहेञे यांचे आचार्य पदवी परीक्षेत यश संपादन

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि विद्या विभागामार्फत घेण्यात आलेल्या आचार्य पदवी (पी.एच.डी.) परीक्षेत पिंपळा ता. आष्टी, जिल्हा बीड या गावाचे सुपुत्र अंबादास नामदेव मेहेत्रे यांनी यश संपादन केले आहे.
  “शेवगा पिकाच्या खत व्यवस्थापन आणि छाटणी तंत्रज्ञान यांचा उत्पादनावर होणारा परिणाम” या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे. या संशोधनाचा राज्याच्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टीने सदरील तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. या संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉ. उल्हास सुर्वे यांचे मार्गदर्शन तसेच डॉ.अरुण तुंबारे, डॉ. अशोक कडलग, डॉ.भरत पाटील, डॉ. चारुदत्त निंबाळकर यांनी समिती सदस्य म्हणून सहकार्य केले. या यशाबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन तथा संचालक विस्तार डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. आनंद सोळंके तसेच पिंपळा गावाच्या ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ३५ व्या पदवीदान समारंभात अंबादास मेहेत्रे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे.मिळालेल्या आचार्य पदवीच्या ( डाॅक्टरेट ) यशात घरातील कुटूंब,मित्रमंडळीचा सिंहाचा वाटा आहे, असे यावेळी डाॅ.अंबादास मेहेञे यांनी सांगितले.
 

Related Articles

Back to top button