अहमदनगर

दलित, पिडीत व बहुजनांच्या हक्कासाठी रिपब्लिकन सेना कार्यरत- जिल्हाप्रमुख आढाव

चिंचोली/बाळकृष्ण भोसले : दलित, पिडीत, शोषित, तरूण व बहुजनांच्या हक्कांसाठी आक्रमक पणे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना जिल्ह्यात व राज्यात काम करीत असून राजकारण हा सेनेचा अजेंडा नसून समाजकारण हा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन या सेनेचे जिल्हाप्रमुख राजू आढाव यांनी केले.


रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रमुख सागर डबरासे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख राजू आढाव यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर विधानसभा अंतर्गत कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच अकोले तालुक्यातील कोतूळ येथील दिव्यानी हायस्कूल येथे घेण्यात आला. त्यात ते बोलत होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मुंबई प्रदेश ऊपाध्यक्ष तथा प्रदेश निरिक्षक विजय देठे होते. प्रसंगी अपंग सेलचे जिल्हाप्रमुख रोहीदास अडागळे, जिल्हा ऊपप्रमुख भरत भांबळ, गंगा नाना विधाटे, इशान्य मुंबई जिल्हाप्रमुख माने, मुलुंड शाखाप्रमुख भिमराव देठे, राहुरी शहर प्रमुख दत्ता जोगदंड, उपस्थित होते.

यावेळी अकोले, संगमनेर विधानसभा अंतर्गत पदाधिकाऱ्यांच्या निवडी जिल्हाप्रमुख राजू आढाव व विजय देठे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अकोले, संगमनेर विधानसभा अध्यक्ष म्हणून गवनेर सरोदे, यांची तर अकोले तालुका प्रमुख परवेश पठाण, महिला आघाडी तालुका प्रमुख राणीताई प्रविण देठे, अकोले तालुका कार्याध्यक्ष किशोर आढांगळे, महासचिव संतोष शिंदे, उपप्रमुख रामदास साळुंके, सचिव अशोक गायकवाड, संतोष सोनवणे, स्वप्नील साळवे, संगमनेर सचिव अरूणा युवराज सुर्यवंशी, राजूर महिला अध्यक्षा संध्या सुनिल देठे, कळस अध्यक्ष गीता देशमुख, राजूर अपंग महिला अध्यक्ष शितल रोकडे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. या मेळाव्यात अनेक लोक कलावंत व कार्यकर्त्यांनी संघटनेत जाहीर प्रवेश केला. शेवटी शितल रोकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले .

Related Articles

Back to top button