महाराष्ट्र
ज्युनिअर जादुगार कानवडे ऑनलाईन मॅजिशियन स्पर्धेत दुसरी
संगमनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निमगाव बुद्रुक येथील ज्युनिअर जादूगार रिया भागवत कानवडे यांनी कोरोना काळात जागतिक दर्जाच्या ऑनलाईन इंटरनॅशनल मॅजिशियन स्पर्धेत भाग घेऊन दुसरा क्रमांक पटकावला आहे.या यशाबद्दल परिसरातुन रिया यांचे अभिनंदन केले जात आहे.
” ग्रामीण भागातील मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी अशा कालांकांराना प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने निधी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.”
गुजरात जिल्हा वलसाड येथे आय बी एम बांगलादेश ब्रांच तर्फे ऑनलाईन इंटरनॅशनल मॅजिशियन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.जागतिक स्तरावरील जादुगार सहभागी झाले होते. या स्पर्धेत रिया भागवत यांनी सहभाग घेऊन दुसरा क्रमांक पटकावला आहे.आय बी एम चे भारतीय प्रतिनिधित्व केलेले जेज पॅनलचे जनरल सेक्रेटरी जादूगर एम राजा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या निमित्ताने अखिल भारतीय क्रांतिसेना पक्षाचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, युवक जिल्हाध्यक्ष इंजि. युवराज सातपुते, इंजि. आशिष कानवडे, तालुकाध्यक्ष अमित कोल्हे, युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोर यांच्या वतीने ज्युनिअर जादुगार रिया यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.