अहमदनगर

श्रमिक मुक्ती दल लढ्याला यश, नवीन रेशन कार्डधारकांना मिळणार अन्नधान्य : संदीप कोकाटे

राहुरी विद्यापीठ/ प्रतिनिधी : श्रमिक मुक्ती दल, लोकशाहीवादी यांनी नवीन रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य पुरवठा मिळणेबाबत दिनांक 18 ऑगस्ट 2021 रोजी लेखी निवेदन दिले होते. त्या लेखी निवेदनास तहसीलदार, राहुरी कार्यालय यांनी दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी लेखी उत्तर दिले आहे.

निवेदनाची योग्य दखल घेऊन 2019 पासून जवळपास तीन वर्षापासून राहुरी तालुक्यातील नवीन रेशन कार्डधारकांना प्राधान्‍य निवडीचा इष्टांक मंजूर होऊन तो वाढविलेला आहे, तरी सदर प्राधान्य निवडीच्या इष्टांक नुसार पात्र लाभार्थी यांनी कागदपत्रांची पूर्तता करून राहुरी तहसील कार्यालयात सादर करतील त्यांना धान्य पुरवठा केला जाईल असे लेखी पत्र संघटनेच्या नावाने मिळालेले आहे.

चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दाभाडे, दुर्गेश वाघ, सुनील पंडित व श्रमिक मुक्ती दलाचे संदीप कोकाटे यांनी याबाबत योग्य पाठपुरावा करून राहुरी तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी हा लढा सुरू केला आहे. तरी तालुक्यातील नवीन रेशन कार्ड धारकांनी तहसील कार्यालयात पाठपुरावा करून स्वतःच्या हक्काचे अन्नधान्य मिळवावे तसेच भविष्यात राहुरी तालुक्यातील नवीन रेशन कार्डधारकांना अन्नधान्य मिळण्यासाठी योग्य पाठपुरावा श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादी करत राहील, असे श्रमुदचे प्रमुख संदीप कोकाटे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button