महाराष्ट्र

शिवप्रहार संघटनेची राज्यस्तरीय बैठक अहमदनगर येथे उत्साहात संपन्न

अकोले प्रतिनिधी : अहमदनगर येथील हॉटेल सुवर्णम् प्राईड येथे शिवप्रहार संघटनेची दि. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्य स्तरीय बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजी. संजीव भोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांतून, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांतून सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. तसेच covid-19 काळात संघटनेचे जे कार्यकर्ते व कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील सदस्य मृत्यू पावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात संघटनेचे काहीसे स्थिरावलेले कामास गती देण्याबाबत, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, ॲट्राॅसिटी कायद्याचा गैरवापर यासह विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली. शेती पंपांच्या सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात, तसेच ऊस उत्पादकांची होणारी अडवणूक याबाबत शिवप्रहार संघटनेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या सहभागातून तात्काळ आवाज उठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. राज्यभर शिवप्रहार संघटनेचे जाळे पसरवून संघटना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने संघटनेत अनेक फेरबदल करण्यात आले. यावेळी नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. प्रदेश सरचिटणीस पदी प्रशांत इंगळे (औरंगाबाद), उद्योग आघाडीच्या प्रदेश संघटकपदी राहुल आरोटे, औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी हितेश पाटील, औरंगाबाद शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्षपदी संजय साठे पाटील, अहमदनगर महानगराध्यक्ष पदी राम झीने, अहमदनगर महानगर उपाध्यक्षपदी प्रमोद भासार, युवक प्रदेश संघटक पदी स्वप्निल नागटिळक(सोलापूर), जिल्हा कार्यकारिणी सदस्य व कायदे विषयक सल्लागार पदी ॲड.योगेश गेरंगे, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष पदी अमोल पाठक, पाथर्डी तालुका अध्यक्षपदी सोमनाथ माने, पाथर्डी तालुका सहसंघटक‌ साहेबराव पवार, पाथर्डी तालुका उपाध्यक्ष पदी बापूसाहेब गोरे, राहुरी तालुका उपाध्यक्ष पदी अरुण जाधव, राहुरी तालुका संघटक पदी अमोल चोथे, राहुरी तालुका कार्याध्यक्षपदी दिपक हुरुळे, प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी संतोष घोलप, राहुरी तालुका उपाध्यक्ष पदी तोहीद पिरजादे, शेवगाव तालुका संघटक मच्छिंद्र कोहक, आष्टी तालुकाध्यक्षपदी सुनील तळेकर, महानगर सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुखपदी आदिनाथ चंद्रे, युवक जिल्हा सचिव सोशल मीडियापदी संदीप चौधरी, नगर तालुका युवक अध्यक्ष पदी गोरख आढाव, अहमदनगर उद्योग आघाडी जिल्हाध्यक्षपदी संदीप सायंबर, पारनेर तालुका संघटक पदी सर्जेराव शिंदे, महानगर खजिनदार पदी संदीप संसारे, पारनेर तालुका सहसचिव पदी वीरेंद्र थोरात आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष कैलास दादा आवारी, प्रदेश संघटक सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त अरुण कदम आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button