शिक्षणवारी ज्ञान पंढरी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरेगाव मध्ये ऑनलाईन लिटिल मास्टर शेफ स्पर्धा संपन्न

आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढावजिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरेगाव मध्ये इयत्ता 3 आणि 4 थी च्या विद्यार्थ्यांची अनोखी ऑनलाईन लिटिल मास्टर शेफ स्पर्धा आयोजित केली होती.

यात विद्यार्थीनींनी खिराफत, मोदक, शेंगदाणा लाडू, भेळ, शिरा, पोहे, अळूची वडी, असे विविध पदार्थ गूगल मीट च्या माध्यमातून साहित्य कृती यांच बरोबर त्या पदार्थचे वैशिष्ट्य, आहारातील महत्व या सर्व गोष्टीसह प्रात्यक्षीक करून दाखवले.
या सर्वांचे परीक्षक म्हणून जे. टी. एस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज व एम सी वी सी. डिपार्टमेंटचे प्राध्यापक विजय ताजणे सर यांनी काम पाहिले. या उपक्रमास गट शिक्षणाधिकारी नेवासा सुलोचनाताई पठारे तसेच विस्तार अधिकारी कराड साहेब व करजगाव केंद्राचे केंद्र प्रमुख नाईक सर उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन दिपाली बोलके – पुराणिक यांनी केले होते. प्रास्तविक गावडे सर व आभार नरसाळे सर यांनी मानले.

Related Articles

Back to top button