ठळक बातम्या

लोणी पोलिस ठाण्यातील खोटे गुन्हे, कारवाई थांबवा – प्रभाताई घोगरे

शिर्डी उपविभागीय पोलीस आधिकारी यांना निवेदन

शिर्डी : लोणी पोलिस ठाण्यात विरोधी विचार दाबण्यासाठी कार्यकर्त्यांवर दिवसेंदिवस खोटे गुन्हे दाखल करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या निषेधार्थ कृषीभुषण प्रभाताई घोगरे यांच्यासह ग्रामस्थांनी आज उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात सौ.घोगरे म्हणाल्या की, लोणी खुर्द ग्रामस्थांवर वेगवेगळ्या प्रकरणात जाणीवपूर्वक कुठलाही काडीचा हितसंबंध नसताना फक्त ते सत्ताधाऱ्यांचे विरोधक आहेत हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेऊन लोणी पोलिस ठाण्यामार्फत खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. दोन दिवसांपूर्वी कामगार तलाठी लोणी खुर्द यांना हाताशी धरून काल्पनिक कथेच्या आधारावर वस्तुस्थितीत असा कोणताही प्रकार झालेला नसताना बळजबरीने खोटा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर बाब अतिशय गंभीर असुन लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले असुन लोक खोटा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून लोणी पोलिसांच्या दबावात आहे.

सदर सुरू असलेला प्रकार अन्यायकारक असल्याने पोलिस अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असल्याने कायद्याचे रक्षक समजले जाणारे पोलिस अधिकारी राजकीय नेत्यांचे रक्षक बनले की काय अशी भावना जन मानसात सुरू आहे. याचा आम्ही सर्व जण जाहिर निषेध करतो. तरी लोणी पोलिस ठाण्यामार्फत दाखल झालेले खोटे गुन्हे व त्यानुसार सुरू असलेली सुडाची कार्यवाही तातडीने थांबवावी अन्यथा दि १२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०:०० वा. हजारोंच्या संख्येने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करू व पालकमंत्री अहमदनगर जिल्हा यांना घेराव घालुन सुरू असलेल्या खोट्या गुन्हे व त्यानुसार सुरू असलेली सुडाची कार्यवाही बाबत जाब विचारू ? असा इशारा कृषीभुषण प्रभाताई घोगरे यांनी दिला आहे.

यावेळी सरपंच जनार्दन घोगरे, सुरेश थोरात, आर्चना आहेर, सुनिता कोरडे, आशा आहेर, राजेंद्र आहेर, राधु राऊत, दिलीप आहेर, अमोल घोगरे, आण्णा तुपे, आप्पासाहेब घोगरे, मंगेश घोगरे, प्रभाकर आहेर, तानाजी मापारी, बाबासाहेब मापारी, राधाकृष्ण आहेर, कुमार मोरे, कैलास कुराडे, विलास आहेर, दिनकर आहेर, शंकर राऊत, कैलास आहेर, अशोक आहेर, शाम घोगरे, चांगदेव घोगरे, दिलीप घोगरे, शाहू आहेर, संजय आहेर, राधाकृष्ण आहेर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button