राजकीय
जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी राष्ट्रवादीचे नेते घनश्याम आण्णा शेलार, राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पोटे यांच्याकडे जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व घनश्याम आण्णा शेलार यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबादास गारूडकर, किसन लोटकेसर, उद्धवराव दुसुंगे, केशव बेरड, रोहिदास कर्डिले, लखन खरसे महाराज, शरद पवार, अमित गांधी, दीपक गुगळे, किरण जावळे, काका पवार, निखिल शेलार, दत्ता डोखडे, शहनवाज शेख, वसीम शेख, बाळासाहेब केदारे, बापूसाहेब देवरे, शहाबाज शेख, निलेश सातपुते, मच्छिंद्र गांगर्डे, सोमनाथ केदारे आदी उपस्थित होते.
राजेंद्र फाळके म्हणाले की प्रकाश पोटे यांची सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी पक्षांमध्ये काम करण्याची संधी देण्यात आली व पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रकाश पोटे म्हणाले की आज मी देशाचे नेते शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारानुसार राष्ट्रवादीचे काम जिल्हाभर वाढवण्याचे काम करील. तसेच यापूर्वीही संघटनेच्या माध्यमातून सामाजिक भान ठेवून समाजातील वंचित घटकांची करत आलेली सेवा यापुढेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अशीच चालू राहणार असल्याची भावना व्यक्त केली. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.