राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, राहुरी तालुकाध्यक्षपदी दिग्विजय शिरसाठ

चिंचोली/बाळकृष्ण भोसले : राज्याचे उर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, यांचे खंदे समर्थक मानले जाणारे तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांचे सुपुत्र श्री दिग्विजय पाटील यांची, नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस ओ बी सी सेल च्या तालुकाध्यक्ष पदी ना जयंत पाटील आणि ना प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी निवड केली आहे.


सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिसंवाद यात्रा सुरु आहे, यानिमित्ताने ना जयंत पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, रुपालीताई चाकनकर आदी मान्यवर राहुरी येथे आले होते, सदर यात्रेचे आयोजन मंत्री तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी ना. पाटील आणि ना. तानपुरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने श्री दिग्विजय पाटील यांना राहुरी तालुका ओ बी सी सेल च्या अध्यक्षपदाची जबाबदारी महेबूब शेख आणि महिला आध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी संयुक्तपणे सोपवली, दिग्विजय पाटील हे मा. खा. प्रसाद तनपुरे, ना. प्राजक्त तनपुरे, यांचे खंदे समर्थक असलेले राहुरी कृषिउत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक अनिल पाटील यांचे चिरंजीव आहेत, गेल्या तीन पिढ्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस च्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार राहुरी तालुक्यात आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे यावेळी श्री पाटील यांनी सांगितले या निवडीबद्दल तालुक्यासह गावातील विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी व्यासपीठावर श्री मच्छिंद्र सोनवणे‌, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, बाबासाहेब भिटे, शब्बीर भाई देशमुख, सुरेश निमसे, धनंजय म्हसे, नंदू तनपुरे, अनिल इंगळे, सुनील आडसुरे, गोरक्ष गाढे, संदीप पानसंबळ, धीरज भैय्या पानसंबळ, बाळासाहेब खुळे, रवींद्र गागरे,‌ सचिन भिंगारदे, किशोर गागरे, मिलिंद अनाप, ज्ञानेश्वर कोळसे, अशोक विटनोर, दत्ता कवाने, सुभाष आढाव, राजेंद्र लोंढे, नरेंद्र अनाप आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपास्थित होते.

Related Articles

Back to top button