कृषी

गॅस पाईपलाईन मुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान; शेतकऱ्यांनी दिले तहसील कार्यालयाला निवेदन


श्रीगोंदा प्रतिनिधी : लिंपणगाव-श्रीगोंदा येथुन जात असलेल्या भारत पेट्रोलियम गॅस पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतीतून खोदकाम करताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. या नुकसानीचे शेतकऱ्यांना कुठलाच मोबदला दिला जात नसल्याने आज अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने श्रीगोंदा नायब तहसीलदार चारुशिला पवार यांना निवेदन देण्यात आले.

    सविस्तर वृत्त असे की, शेतकरी कृष्णा वसंत कुरुमकर यांनी क्रांतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत घडलेली हकीकत सांगत तक्रार अर्ज दिला. या अर्जाची दखल घेत वरील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कृष्णा कुरुमकर, लिंपणगाव हे श्रीगोंदा- लिंपणगाव महामार्गालगत असलेल्या शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. सदर शेतामधून भारत पेट्रोलियम गॅसची पाईपलाईन जात आहे. शेतीतून खोदकाम करताना सदर गट नंबर मधील मोठमोठी झाडे काढून टाकण्यात आली. वृक्षतोड करताना शेतकऱ्यांची याबाबत कुठलीही परवानगी न घेता रात्रीच्या वेळी वृक्षतोड करण्यात आली. त्याचा कोणताही प्रकारचा मोबदला सदर शेतकऱ्यांना दिलेला नाही. कुरुमकर कुटुंब शेतीसोबत जोड़धंदा म्हणून त्या ठिकाणी हॉटेल चालवत आहेत. हॉटेल समोर शेतात असणारे वीस वर्षाची जुनी झाडे रात्रीच्यावेळी काढण्यात आलेले आहे. त्याची कोणतीही कागदोपत्री परवानगी घेतलेली नाही, कॉन्ट्रॅक्टरचे म्हणणे आहे की, झाडे काढण्यासाठी फॉरेस्ट खात्याची कोणतीही परवानगी काढण्याची गरज नाही. तरी शासकीय नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्यावा. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई न मिळाल्यास “अखिल भारतीय क्रांतीसेना पक्ष ” यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रमुख सुभाष दरेकर, उपजिल्हाप्रमुख अविनाश कुरूमकर, श्रीगोंदा तालुका प्रमुख संदीप डेबरे व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Related Articles

Back to top button