शिक्षणवारी ज्ञान पंढरी

चव्हाण आदर्श शिक्षिका तर जाधव आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित

बेलापूर खुर्द : विश्वनाथ जाधव यांचा सपत्नीक आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करताना केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकवृंद (छाया : संदीप पाळंदे)


आंबी : बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार विद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या अध्यापिका चव्हाण पुष्पा सर्जेराव यांना तर आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाधव विश्वनाथ गोकुळदास यांना देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव गोविंद विद्यालयाचे माजी प्राचार्य रमेश वारुळे हे होते. याप्रसंगी आदर्श शिक्षिका पुष्पा चव्हाण व शिक्षेकेतर विश्वनाथ जाधव यांचा विद्यालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सोपानराव मगर, पर्यवेक्षक अर्जुन गाडे, जेष्ठ शिक्षक बाळासाहेब हारदे, चंद्रकांत भांड, भारत वारुळे, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक संजय कोळसे, सर्जेराव चव्हाण, प्रकाश राजुळे, काळे भाऊसाहेब, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती लोखंडे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षस्थानावरून बोलताना विद्यालयाचे माजी प्राचार्य वारुळे यांनी माझ्या विद्यार्थिनीला मिळालेला पुरस्कार हा निश्चित गौरवास्पद असून त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना प्रेरणा देत राहील. अशा विद्यार्थी प्रिय शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक उदय गायकवाड, आण्णा आरंगळे, रामनाथ तांबे, शिक्षक प्रतिनिधी प्रशांत होन, सुरेश चव्हाण, पंढरीनाथ शिंदे, रविकिरण गायकवाड, प्रसाद शिंदे, विशाल कोळसे, विनोद जुंदरे, प्रदीप खपके, शिक्षिका श्रीमती गायकवाड, लोखंडे, दंडवते, खर्डे, आढाव, तावरे, येवले तसेच शिक्षेकेतर प्रतिनिधी राजेंद्र खरात, काळे भाऊसाहेब, बाप्पू देवकर, भाऊसाहेब देव्हारे, अशोक निमसे सुबंध आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय गायकवाड यांनी केले तर आभार चंद्रकांत भांड यांनी मानले.

Related Articles

Back to top button