अहमदनगर

घर कामगारांच्या हक्कासाठी समविचारी संघटनांना सोबत घेऊन संघर्ष करणार-कोकाटे

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : घर कामगार महिलांची श्रम सन्मान सभा मोठ्या उत्साहात ७ ऑक्टोबर जागतिक सन्मानजनक काम दिवसानिमित्त राहुरी शहरात ११ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आली. या श्रम सभेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. जिल्हा लीडर प्रमुख सुवर्णाताई जगधने यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची परिवर्तनात्मक ओवी गाऊन सुरुवात केली. प्रमुख मार्गदर्शक यांच्या वतीने जिल्ह्यातील घरकाम करत असलेल्या सन्मान सभेस उपस्थित असलेल्या सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन त्यांच्या कामाचा, कार्याचा गौरव करण्यात आला व श्रम सन्मान सभा घेण्यात आली.
या सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून लाल निशाण व श्रमिक संघाचे अध्यक्ष कामगारांचे नेते कॉम्रेड शरद संसारे यांनी आपले मत मांडताना महाराष्ट्रातील घरकामगार महिलांचा मूलभूत हक्कासाठी तसेच शासनाने कल्याण मंडळात नोंदणी करण्यासाठी मंडळ स्थापन केले आहे. त्याठिकाणी येणाऱ्या अडचणींवर आपल्याला कृतिशील लढा उभा करावा लागणार आहे. तसेच आता बेरोजगारी वाढत आहे, महिलांना काम मिळत नाही, स्वावलंबी स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी आपल्याला पर्याय उभा करावा लागणार आहेत. आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आपला देखील सन्मान व्हावा, आपल्याला देखील हक्क अधिकार मिळाले पाहिजेत म्हणून त्यांना किमान वेतन कायद्याच्या परिशिष्टात समावेश करून किमान वेतन ठरवण्यात यावे, कामगार कल्याण मंडळ कायदा 2008 या कायद्याला कल्याणकारी कायद्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी आपण संघर्ष करत राहुयात. आम्ही घर कामगार संघटनेसोबत आहोत असे मनोगतामध्ये मत व्यक्त केले. 
जिल्ह्यातील वंचित घटकाचे नेते तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांनी देखील घरकामगार महिलांना सन्मानजनक त्यांचा सन्मान झाला पाहिजे राशन समस्या असेल, शासनाच्या योजना असतील, कल्याण मंडळ नोंदणी कायदा हक्क अधिकार यासाठी लोकप्रतिनिधी व सत्ताधारी काम करत नसतील तर आम्ही घरकामगारांचा हक्क अधिकारासाठी मोर्चा आंदोलन करण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी घरकामगार युनियन यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यात ताकतीने उभे राहू असे आश्वासन दिले आहे.
सामाजिक कार्यकर्ते जयेश माळी, कुमार भिंगारे, राजु दाभाडे, महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियनच्या सचिव वर्षाताई बाचकर यांनी महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन राज्यात व देशात कल्याण मंडळ नोंदणीसाठी व आपले हक्क अधिकारासाठी संघर्ष करत आहे, असे मत व्यक्त केले व तसेज जिल्हा समन्वयक संदीप कोकाटे यांनी जिल्ह्यातील समविचारी कामगार संघटनांना सोबत घेऊन आपण लढत राहूया असे मनोगत व्यक्त केले. म्हणून त्यांचा सन्मान युनियनच्या वतीने आज आपण श्रम सन्मान सभेचे आयोजन केले. श्रम सन्मान सभेचा शेवट जिल्हा समन्वयक यांनी भारतीय संविधान प्रास्ताविक वाचन करून व सर्वांचे आभार व्यक्त करून संपन्न झाला. श्रम सन्मान सभेस बेबीताई शिदें, आयशा शेख, अंजुम शेख, ताराबाई गुंजाळ इतर घरकामगार महिला या सन्मान सभेत उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button