राजकीय

आमदार रोहीत पवार यांचे पैठण येथे जंगी स्वागत

विलास लाटे/पैठण : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तरुण तडफदार आमदार रोहितदादा पवार हे शनिवार,२३ रोजी पैठण येथे संत एकनाथ महाराज समाधी मंदिर दर्शन व आरतीसाठी आले असता सह्याद्री नाका, खंडोबा मंदिरमार्गे नाथ मंदिर परिसरापर्यंत माजी आमदार संजय पाटील वाघचौरे व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विशाल संजय वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. आमदार रोहीतदादा पवार हे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या बुलेटवर बसले व भव्य मोटार सायकल रॅली निघाली खंडोबा मंदिर परिसरात आमदार रोहीत पवार यांचे क्रेनद्वारे पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले.        

        यावेळी माजी आमदार संजय वाघचौरे, जिल्हाध्यक्ष विलासभैय्या शेळके, विधानसभा क्षेत्राध्यक्ष डॉ. गुलदाद पठाण, शहराध्यक्ष तथा नगरसेवक जितू परदेशी, न प गटनेते कल्याण भुकेले, नगरसेवक बजरंग लिंबोरे, ज्ञानेश घोडके, शहरकार्याध्यक्ष बब्बू फुलारी, अनिल हजारे, उमेश पंडुरे, ॲड सुभाष खडसन, विष्णुकांत मुंदडा, राजू बोंबले, तौफिक धांडे, महेंद्र साळवे, गौरव आठवले, सतिष सर्जे, फेरोज खान आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वागत केले. नंतर नाथ मंदिर समाधी स्थळ येथे जाऊन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी संस्थानच्या तसेच नाथ वंशज यांच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. 

   यावेळी गणेश शेळके, राजु शेख, शिवाजी घोडके, भगवान कुमावत, रामदास थोटे, ज्ञानेश्वर कागदे, नाना मोरे, प्रा सुमित मुळे, महेश भोसले, शेखर देशमुख, काकासाहेब गलधर, पंढरीनाथ सोनवणे, दत्ता लोहगळे, राजु शिंदे, शिवाजीराव वाघचौरे, सुशील बोडखे, श्रीकांत तरमळे, अनिरुद्ध गोजरे, गणेश कणसे, दादा पा.मुळे, वसंत वाघचौरे, गजानन भांड, आकाश निर्मळ, रयस चाऊस, अनिल वाघचौरे, अश्विन परदेशी, गोरख घायाळ, शाहरुख पटेल, सचिन शेळके, सतिश कानुले, अमोल जाधव, राजु माडेकर, वैभव वाघ, आकाश शेळके, अभिषेक तांगडे, सोमनाथ चेमटे, साईनाथ गरड, अमर दसपुते, धोंडीराम घोरपडे, अशोक थोरात, मयुर लांडगे, शिवा पाचफुले, शुभम छडीदार, सुजित दानोले, राम भुकेले, अनिल लिंबोरे, सुदर्शन बल्लोज, आप्पा जाधव यांच्या सह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button