क्रीडा

गाव तिथे क्रीडांगण संकल्पना राबविण्याची गरज – ढुस

देवळाली प्रवरा प्रतिनिधी : सर्वत्र ऑलिम्पिक सुवर्णपदकाची धूम चालू असताना देशाचे भावी खेळाडू देवळाली प्रवराच्या स्मशानभूमीत सराव  करत आहे. पदक तालिकेत देशाचे नाव उंचाविण्यासाठी गाव तिथे क्रीडांगण संकल्पना राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केले आहे. 

     ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होत आहे, 135 कोटी लोकसंख्येचा अनु राष्ट्र असलेला आपला देश पदकतालिकेत थेट 47 व्या स्थानी आहे, तरीही 1 सुवर्ण, 2 रजत आणि 4 कांस्य पदके घेऊन आम्ही हुरळून गेलोय, जल्लोष साजरा करतोय, ऑलिम्पिक इतिहासात 121 वर्षात पदकांची शंभरी सुद्धा अजून गाठू शकलो नाही. ऑलिम्पिक खेळात आपल्या देशाचे स्थान या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आप्पासाहेब ढुस बोलत होते.

देवळाली प्रवरा सारख्या ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावूनही येथील भावी खेळाडू स्मशानभूमीत सराव करीत आहेत. तरुणांना स्मशानभूमीत व्यायाम करण्याची आणि खेळाचे मैदान बनविण्याची वेळ आली असल्याने गाव तिथे क्रीडांगण ही संकल्पना अंमलात येणे गरजेचे असल्याचे मत आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केले.

Related Articles

Back to top button