औरंगाबाद

लिंबगाव येथे शेततळ्यात विषबाधा झाल्याने हजारो माशांचा तडफडून मृत्यू

 
  विजय चिडे/ पाचोड : पैठण तालुक्यातिल लिंबगाव येथिल एका मत्स्य उत्पादकांच्या शेततळ्यात असणारे हजारो मासे तडफडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की,लिंबगाव ता.पैठण येथिल शेतकरी प्रभाकर केशव गाढेकर यांनी गतवर्षी आपल्या स्वतःच्या शेततळ्यात शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्यपालन सुरू केले. त्यांनी ३० बाय ३० च्या शेततळ्यात दहा हजार मत्स्यबीज सोडले होते. आत्ता हे मत्स्य एकवर्षा नंतर मासे एक किलोच्या वजनाचे झालेले असून अजून तीन महिन्यांनी त्यांचे वजन दोन किलोचे होतील. मात्र, दोन दिवसापूर्वी शेततळ्यात अज्ञात व्यक्तिने विष सोडले असल्यामुळे शुक्रवारी सकाळी त्यांना शेततळ्यातील मासे तडफडून मरताना आढळले. 

यामध्ये एका दिवसात जवळ पास पाच-सहा हजार मासे मृत झाले असुन राहिलेले माशांचा सुध्दा मृत्यू होत आहे. या माश्यांवर गाढेकर यांनी आत्ता पर्यंत दोन लाख रुपये खर्च केला होता. एक वर्षात माशांच्या खाद्यासाठी दोन लाख रुपये खर्च आला आहे. या माशांना दिवसातून दोन वेळा हे खाद्य दिले जाते. परंतु अज्ञात माथेफिरुने विषप्रयोग केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे त्यांचे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेने त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या मासे विक्रीतून त्यांना चांगला नफा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु आत्ता मात्र त्यांच्या अपेक्षावर पाणी फेरले गेलं आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या मास्यांचा पंचनामा करुन या मत्स्यपालन शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावे अशी मागणी केली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button