औरंगाबाद

गणेश बरडे यांची छावा क्रांतिवीर सेनेच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती

विलास लाटे /पैठण : छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करणं भाऊ गायकर  यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस अनिल पाटील राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, जिल्हाध्यक्ष संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार,१७ रोजी शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गणेश नामदेव बरडे यांची अहमदनगर जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकारी बरडे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, संघटनेने टाकलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. आदरणीय करणभाऊ गायकर यांनी सुचविलेले ध्येय धोरण समोर ठेवत, सामाजिक कार्यात सहभागी राहून जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहील तसेच शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार आहे. युवक वर्गांची मोठी फळी उभा करणार असून येत्या काही दिवसांत शाखा उद्घाटन सोहळा आयोजित करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी मराठवाडा सचिव भगवान सोरमारे, शेवगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील राजेभोसले, महेंद्र नरके, कृष्णा काळे, राजेंद्र कारेगावकर आदी उपस्थितांनी अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button