अहमदनगर

शहागड युवा प्रतिष्ठानच्या वतीने पेमगिरीत आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती साजरी

संगमनेर/ बाळासाहेब भोरऐतिहासिक व नैसर्गिक वैभवप्राप्त स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत आज नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
पेमगिरीचे भूमिपुत्र उपक्रमशील शिक्षक अशोक शेटे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व निमगाव बु.चे माजी उपसरपंच युवा नेतृत्व बाळासाहेब कानवडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल शहागड युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पेमगिरीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शहागड युवा प्रतिष्ठानचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button