अहमदनगर
खुडसरगांव येथे श्री कालभैरव मंदिर भुमिपुजन व जन्मोत्सव सोहळा
आरडगांव/राजेंद्र आढाव : श्री कालभैरव जन्माष्टमी निमित्त स्वयंभू मूर्ती (तांदळा) अभिषेक व मंदिर भूमिपूजन सोहळा शनिवार दि २७ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. तरी या कार्यक्रमाचे लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान खुडसरगांव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी तिरी वसलेले खुडसरगांव येथे शनिवार दि २७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ६ वाजता पुराण काळातील जागरूक देवस्थान म्हणून ओळख असणारे श्री कालभैरव जन्माष्टमी निमित्त स्वयंभू मूर्ती (तांदळा) अभिषेक तसेच सकाळी ७ वा. ह.भ.प. भागवताचार्य स्वामी श्यामसुंदरजी महाराज पुरी यांच्या शुभहस्ते मंदिर भूमिपूजन होणार आहे.
तदनंतर श्री कालभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त दुपारी ४ ते ६ ह.भ.प.भागवताचार्य स्वामी श्यामसुंदरजी महाराज पुरी यांचे किर्तन व महाप्रसादानी कार्यक्रमाची सांगता होईल. तरी या कार्यक्रमाचे लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान खुडसरगांव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.