शिक्षणवारी ज्ञान पंढरी

ज्ञानभोज

स्पर्धा परीक्षेसाठी एक व्याखान सुरु होणार होते. 2500 पेक्षा मुल/मुली उत्साहाने बसली होती. पाहुण्यांना यायला थोडा वेळ होता म्हणून एका प्राध्यापक मित्राला खिंड लढवायला सांगितली.
         खड्या आवाजात खर्डया भाषेत ते बोलत होते, बोलता-बोलता मध्येच म्हणाले अभ्यासाचे बाकी सगळं ठिक आहे तो होत राहील.
पण तुमचं खाण चांगलं पाहिजे?
थोडा पॉज घेऊन म्हणाले 
खाण कशाचं? 
परत मोठा पॉज, 
सगळं सभागृह स्तब्ध
 पुढे हळूच म्हणाले…
अरे खानं कशाचं
 ज्ञानाचं खानं!
तुमची ही ज्ञानाची भूक कधीही भागता कामा नये.!
 सगळं सभागृह अवाक झालं.
मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं ?
 दिवसभर प्रत्येकजण ‘ज्ञानाचं खानं’ यावर चर्चा करत होता. वास्तविक ही, ज्ञानपिपासू वृत्ती जोपासन्याची प्रवृत्ती कणाकणाने ज्ञान गोळा करण्याची, ही भावनाच किती उदात्त आहे …
 ती फक्त स्पर्धा परीक्षेसाठी न ठेवता आपली ती भुभूक्षू, हाव विजिगिषु प्रवृत्तीने जोपासून अधाशीपणे ज्ञान ओरबडले पाहिजे… जिथून मिळेल तिथून… कसेही येन, केन प्रकारेण… साम, दाम, दंड, भेद वापरून …
     ज्ञानाचं ताट वाढलेलंच असते, ते ग्रंथालयात असतंच पण बोटाच्या टोकावर महाजालावर सुद्धा उपलब्ध आहे. 
माणसं वाचणे हा तर मोठा भाग…
काही बेरकी,
काही वाकड्या चालीची,
 काही सरळ,
 काही सरळ असल्याचा आव आणणारी,
 खोटं बोलणारी,
 धादांत खोटं वागणारी,
दुसऱ्याला कायम पाण्यात पाहणारी,
 आपणच कसे बरोबर हे सांगणारी,
 काहीजण अतिशय शांत पवित्र सोज्वल, अगदी साजूक   तुपासारखी, काही भिड न बाळगणारी,
 कितीही काही केलं तरी काहीच न करणारी…
काही प्रचंड कष्ट घेणारी 
असीम कष्टाची कहाणी सांगणारी…
काही भविष्याचा वेध घेणारी 
काही वर्तमानात जगणारी 
इतर काही फक्त भूतकाळात आयुष्य घालवणारी …
मी हे केलं, मी ते केलं, मीच केलं, माझं होतं, मीच मीच मीच करणारी…
काही करून सोडून मोकळी होणारी…
 कसलाही अभिनिवेश न दाखवता दुसऱ्यांना मोठं करणारी…
 स्वतः नामे निराळी राहणारी 
इतरांना मोठी करणारी 
किती प्रकारची माणसं …
माणसं वाचन सोपं नसतं… ते येऱ्या गबाळ्याचे काम नोहे…
चालताना ज्ञान घेता येतं तसं कॅन्टीनमध्ये घेता येते अगदी वडापाव खाताना वीना गवाणकरांनी लिहिलेल्या एक होता कार्व्हर, जॉर्ज वॉशिंग्टन या कादंबरीत उल्लेख केल्याप्रमाणे जॉर्ज मुलांना ज्या पद्धतीने शिकवतो आणि सांगतो की या तुम्ही जे पदार्थ खाणार मेस मध्ये त्या प्रत्येक पदार्थाचे इंग्रजी, बोटॅनिकल, झूलॉजिकल नाव जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्हाला ते खाता येणार नाही …
जी मुले इंग्रजी बोलू शकत नव्हती जी बोटॅनिकल किंवा केमिकल किंवा झूलॉजिकल, ग्रीक किंवा रोमन नाव सांगू शकत नव्हती ते धडा धडा बोलायला लागली कारण भुकेपोटी माणूस काहीही करू शकतो…
जशी उपाशीपोटी आपली भुकेची आच असते तशीच ज्ञानाने मी अर्धवट आहे कळलं तरच मला ज्ञानाची भूक लागेल…
निसर्गवाचन हा तर ज्ञानाचा खजिनाच …
‘किती घेशील दो कराने’ 
असे व्हावे अर्थात सर्व ज्ञानेंद्रिय उघडी ठेवून ज्ञान चहुबाजुंनी खाल्ल तर भरमेंदू (भरपेट सारख) ज्ञानाचं जेवण होईल.
मन्नू भंडारी ची ‘महाभोज‘ नावाची एक कादंबरी व नाटक आहे हा ज्ञानाचा महाभोज अर्थात ‘  
 ‘जाणिजे ज्ञानकर्म’ होण्यासाठी प्रयत्न करूया. ज्ञानकर्मी होऊ या.   
 ज्ञान घेऊया…
 ज्ञान देऊया…
 ज्ञान वाटुया…
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य, शेठ टीकाराम जगन्नाथ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खडकी.
सदस्य, अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे.

Related Articles

Back to top button