सामाजिक

खांडगाव ते पेमगिरी रस्ता दुरुस्तीची क्रांतीसेनेची मागणी

संगमनेर : तालुक्यातील खांडगाव ते पेमगिरी संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झाला असून प्रवाश्यांना प्रवास करताना त्रास होत असल्याच्या तक्रारी क्रांतीसेनेच्या पदाधिकार्यांकडे आल्या होत्या.त्या अनुषंगाने रस्ता दुरुस्ती मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेरचे कार्यकारी अभियंता आर आर पाटील यांना देण्यात आले.

     सविस्तर वृत्त असे की,रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने तसेच आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या खड्यात पाणी साचलेले आहे.परिणामी वाहन चालकाला गाडी चालवताना खेड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.हा रस्ता खांडगाव पासून  निमज-धांदरफळ -निमगाव पागा व शेवटी पेमगिरीला जातो. या रस्त्यावर प्रामुख्याने स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरी येथे वटवृक्ष व शहागडावर येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ जास्त असते. तसेच ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी उद्योग, व्यवसाय व नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांना खराब रस्त्यामुळे व वेळेत कामावर न पोहोचल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने दोन आठवड्याच्या आत या रस्त्याचे काम सुरु करावे,अन्यथा रस्त्यावर पडलेल्या खड्यात वृक्षारोपण करून क्रांतीसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल,असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि.युवराज सातपुते, इंजि.आशिष कानवडे, तालुकाध्यक्ष अमित कोल्हे, युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब भोर आदी उपस्थित होते.
 

” सध्या पावसाचे दिवस असल्याने काम करणे शक्य नाही दसऱ्यापर्यंत कामास सुरुवात केली जाईल तसेच खड्डे बुजविण्याचे काम लवकरात लवकर सुरू करू असे आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंता आर पाटील साहेब यांनी क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.”

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button