अहमदनगर

ग्रामस्थांच्या वतीने वृक्ष लागवड

आरडगांव (प्रतिनिधी) : राहुरी तालुक्यातील माहेगांव येथील जिल्हा परिषद शाळेतील आवारात व स्मशानभूमी परिसरात सरपंचासह ग्रामस्थाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली आहे. 

माहेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्ष लागवड करताना सरपंचांसह ग्रा.सदस्य व ग्रामस्थ आदी…( छाया- श्रीकांत कवडे )

     नुकत्याच झालेल्या पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते.तसेच वड,आंबा,आवळा, जांभूळ,चिंच,बांबू, सिताफळ, नारळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड केली आहे.
 या प्रसंगी सरपंच शारदाताई आढाव, उपसरपंच रावसाहेब गोलवड,पोलीस पाटील पंकज आढाव, तंटामुक्ती अध्यक्ष उध्दव थेवरकर, बाळासाहेब बोंबले, नवनाथआढाव, केशव आढाव, वाल्मिकी गायकवाड, दत्तात्रय कवडे, आप्पासाहेब बोंबले, शिवाजी गोलवड, विजय बोंबले, भारत गायकवाड, रामभाऊ सोळंके,भारत भोईर,ग्रामसेवक राजेंद्र बोठे, मुख्याध्यापिका रोहिणी मदगे,अंगणवाडी सेविका अर्चना राव,रंजना खडगांळे,सुरेखा झारेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button