औरंगाबाद

खदानीतील ब्लास्टिंगमुळे आडगाव जावळे परिसर हादरले..

फोटो : आडगाव जावळे येथिल खदानीत अशाप्रकारे बोर ब्लास्ट होत असल्याचे दिसत आहे.
विजय चिडे/पाचोड : पैठण तालुक्यातील आडगाव जावळे गावाजवळच्या खदानीमध्ये ब्लास्टिंग होत असल्यामुळे गावातील घरांना तडे गेले असून मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. आडगाव जावळे येथे चार खासगी स्टोन क्रेशर सुरू असून त्यांच्या खदानी आहे. त्यामधून दररोज मोठ्या प्रमाणात दगडाचे उत्खनन केले जाते. स्टोन कंपनीचे चालक हे दगडाचे उत्खनन करण्यासाठी ब्लास्टिंगचा वापर करत असतात. मात्र हेच ब्लास्टिंग परिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.

गावातील अनेकांच्या घरांना मोठं मोठे तडे गेले असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक चांगलेच संतापले आहेत. स्टोन क्रेशर खाण उत्खनन आडगाव जावळे पासून काही अंतरावर आहे. तेथे बोर ब्लास्ट करीत असल्याने जेव्हा ब्लास्ट होतो तेव्हा पूर्ण घर हादरुन जाते व घरातील भांडी सुध्दा पडु लागतात. जणू काही भुकंप झाला की काय असे वाटू लागते. ब्लास्टमुळे घरांना परिसरात रस्त्यावर मोठ मोठयाला भेगा पडल्या आहेत. बोर ब्लास्टमुळे दगडे लांब वर येतात. यामुळे मनुष्य हानी देखील होण्याची दाट शक्यता वाढली आहे. ब्लास्टमुळे गावातील बोअरवेलला असलेले पाण्याची पातळीसुध्दा कमी आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील लांबवर वणवण भटकंती करावी लागते.

खदानीतून अवैध दगड उपसा मोठ्या प्रमाणावर चालु असून जेसीपी पोकलेन च्या साह्याने प्रशासनाच्या नाकावर टिच्चून या ठिकाणाहून रात्रंदिवस उपसा सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. शासनाच्या आदेश धाब्यावर बसवून आडगाव जावळे गावालगत खडी क्रेशर माफिया बेकायदेशीर खदानी चालवत असल्याचे पाहावयास मिळत आहे. आडगाव जावळे शिवारात साईराम क्रेशर स्टोन, वडंर क्रेशन स्टोन, जे.के.क्रेशर स्टोन व क्रेशर कृष्णा या चार क्रेशर स्टोन रात्र दिवस सुरु राहत आहे. रात्रीच्या दगड चोऱ्यांची स्पर्धा सुरु असते. या क्रेशर स्टोनवर एक रात्री लाखो रूपयांचा दगडांची रात्रीतून विल्हेवाट लावले जात आहे. सदर खडी क्रेशरचे मालक हे शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याची बाब समोर आली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button